breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पोलीस आयुक्तालयानंतर आता गुन्हे शाखेलाही पालिकेची इमारत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या गुन्हे शाखेच्या (यूनिट दोन) कार्यालयासाठी महापालिकेच्या निगडी येथील यमुनानगर येथे अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळेची इमारत भाडेतत्वावर देण्यात येणार आहे.

पिंपरी, चिंचवड, निगडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रासाठी गुन्हे शाखा युनिट दोनचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने या कार्यालयासाठी महापालिकेच्या निगडीतील यमुनानगर येथील अहिल्यादेवी होळकर व्यायामशाळेची इमारत भाडेतत्वावर देण्यात यावी, अशी मागणी पोलीस आयुक्तांनी 20 ऑगस्ट 2019 रोजी महापालिका प्रशासनाकडे केली होती.

या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 91.64 चौरस मीटर आहे. तर, तळमजला 986.41 चौरस फुट आहे. पोलीसांना कायदा-सुव्यवस्था राखणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने ही इमारत पाच वर्षासाठी भाड्याने देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button