breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोल्हापूरातील धामोड युनियन बँकेच्या शाखेवर दरोडा, 16 कोटी रुपयाचा ऐवज लंपास

कोल्हापूर |महाईन्यूज|प्रतिनिधी|

कोल्हापूर जिल्ह्यातील धामोड इथल्या युनियन बँकेच्या शाखेवर दरोडा पडल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या दरोड्यात चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने मिळून अंदाजे 16 कोटी रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरोड्याची माहिती मिळताच जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यामधील धामोड बाजारपेठेतील युनियन बँकेवर दरोडा पडला. यामध्ये दरोडेखोरांनी बँकेच्या स्ट्राँगरूममधून 16 कोटींचे सोने आणि 15-20 लाख रुपये लंपास केल्याचा प्राथिमक अंदाज आहे. दरोड्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळावर मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाले आहेत.

या प्रकरणी पोलीस तपास सुरू असुन तपास पुर्ण झाल्यानंतरच दरोडयामध्ये किती रोकड आणि सोने चोरीला गेले याची माहिती देण्यात येईल असे राधानगरीचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button