breaking-newsपिंपरी / चिंचवड
पिंपरीतील जलकुंभाचे कै. दिलीप गुलाबरावर कुदळे असे नामकरण
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्र. २१ मधील पिंपरी वाघेरे येथील कै. अनुसयाबाई वाघेरे प्राथमिक शाळेच्या परीसरात नव्याने उभारण्यात आलेल्या २० लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभास माजी कार्यकारी अभियंता कै. दिलीप गुलाबराव कुदळे असे नामकरण करण्यात आले.
त्याचे अनावरन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास नगरसदस्य संदिप वाघेरे, सहशहर अभियंता मकरंद निकम, माजी नगरसदस्य रंगनाथ कुदळे, आदि मान्यवर उपस्थित होते.