breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राष्ट्रीय आणीबाणी जाहीर

वाशिंग्टन | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलीय. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 50 अब्ज डॉलरची तरतूदही करण्यात आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. दरम्यान, कोरोनामुळे अमेरिकेत 41 जणांचा मृत्यू झालाय तर दोन हजारहून अधिक जणांना याची लागण झाली.

चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेला कोरोना व्हायरस आतापर्यंत 114 देशांत पोहोचला आहे. जवळपास सव्वालाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर, चार हजारच्या आसपास लोकांचा यात मृत्यू झालाय. जागतिक आरोग्य संघटना (WHO) प्रमुख टेड्रोस गेब्रेसियोस यांनी सांगितले की, चीनच्या तुलनेत युरोपीयन देशांमध्ये हा आजार वेगाने पसरत आहे. एकट्या इटलीमध्ये मृतांचा आकडा 1266 झाला आहे. तर 17660 लोकांना या विषाणूचे संक्रमण झाले आहे.

या पार्श्वभूमीवर अनेक देश आता खबरदारीचा उपाय अवलंबताना दिसत आहे. युक्रेनने परदेशी नागरिकांना आपली सीमा बंद केली. येथे तीन जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव ऑफ्रिकन खंडातील सुमारे 18 देशांमध्ये झाला आहे. स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी देशात 15 दिवसांची आपत्कालीन परिस्थिती जाहीर केलीय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button