breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनासोबत जगतानाची वस्तुस्थिती उलघडणार छायाचित्रांद्वारे

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२० दरम्यान कोरोनासोबत जगताना या विषयावरील फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. सदर स्पर्धा हि विनामुल्य असून यामध्ये शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.

दरवर्षी १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना विषाणूच्या प्रदुर्भामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये मोठ्याप्रमाणावर बदल घडलेला आहे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सोशल डीस्टंसिंगचे पालन करणे, मर्यादित प्रवाशांसह वाहन प्रवास करणे, मर्यादित कर्मचा-यांसह कार्यालयीन कामकाज करणे आदी बाबींचा दैनंदिन जीवनामध्ये नव्याने समावेश झाला आहे. कोरोनासोबत जगताना दैनंदिन जीवनामध्ये आलेल्या बदलांचे चित्रण स्पर्धकांच्या छायाचित्रांमधून दिसणे अपेक्षित आहे, असे
या स्पर्धेचे परिक्षक छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी सांगितले.

स्पर्धेसाठी २१ वर्षाखालील गट, महिला गट व खुला गट असे तीन गट करण्यात आले असून प्रत्येक गटामध्ये प्रथम क्रमांकासाठी र.रु. ५,०००/- व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकासाठी र.रु. ३,०००/- व प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकांसाठी र.रु. २,०००/- व प्रशस्तीपत्रक तर दोन उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी प्रत्येकी र.रु. १,०००/- व प्रशस्तीपत्रक अशा स्वरुपाची बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे सहाय्यक आयुक्त व आर्टिस्ट कम फोटोग्राफर परिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक छायाचित्रकारांनी आपली छायाचित्रे [email protected] या ईमेल वर त्यांच्या संपूर्ण नाव, वय, पत्ता व मोबाईल क्रमांकासह दि. १० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२० दरम्यान पाठवावीत. प्रिंट स्वरूपातील छायाचित्रे स्पर्धेसाठी स्वीकारली जाणार नाहीत. एक स्पर्धक कमाल ५ छायाचित्रे स्पर्धेसाठी सादर करू शकेल. स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारा प्रत्येक फोटो किमान २ mb चा असावा. या स्पर्धेसाठीमोबाईलवर काढलेले फोटो तसेच इतर कोणत्याही कॅमेराद्वारे काढण्यात आलेले फोटो पात्र राहतील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी इच्छुकांनी विलास साळवी (मो- ८८५५८९२८०३) व खुशाल पुरंदरे (मो- ९६६५८७५०८८) यांच्याशी संपर्क संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button