breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

#Kozhikodeincident : विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेले कॅप्टन डी.व्ही. साठे यांची आई म्हणते…!

मुंबई । टीम ऑनलाईन

केरळमध्ये कोझिकोड विमान दुर्घटनेत कॅप्टन दीपक वसंत साठे या मराठी वैमानिकाचा मृत्यू झाला. आपला ध्येयवेडा मुलगा एका वृद्ध माता-पित्याने गमावला. ही हृदयद्रावक घटना कानावर पडताच त्यांचा आश्रुंचा बांध फुटला… वृद्ध झालेली आई आपल्या मुलाबाबत काय म्हणते…

तर माझा मुला सर्वांच्या मदतीला धावून जाणारा होता. आजही त्याचे शिक्षक त्यांच्या चांगल्या स्वभावाची आठवण  काढतात. त्याला ॲप्रिसिएट करतात. माझा  मुलगा शूर होता…अशी साश्रु प्रतिक्रीया कॅप्टन डी. व्ही. साठे यांच्या आई-वडिलांनी दिली.

कॅप्टन साठे भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले फायटर पायलट होते. ही विमान दुर्घटना घडली तेव्हाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. कॅप्टन दीपक वसंत साठे असं अपघातात ठार झालेल्या मराठी वैमानिकाचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोझिकोड विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात कॅप्टन दीपक साठे यांचाही समावेश आहे.

कॅप्टन दीपक साठे हे भारतीय वायुसेनेचे निवृत्त फायटर पायलट होते. एक चांगले कुशल फायटर पायलट म्हणून त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button