breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सोलापुरात जानेवारीत कांद्याची उच्चांकी आवक

सोलापूर |

सोलापूरच्या कांदा बाजारात मागील जानेवारी महिन्यात तब्बल १२ लाख ३८ हजार २५१ क्विंटल कांद्याची उच्चांकी आवक झाली. यात झालेली आर्थिक उलाढाल १९९ कोटी ३५ लाख रुपयांची आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या दहा वर्षांपासून प्रामुख्याने कांदा बाजारासाठी ओळखली जाते. राज्यात कांद्यासाठी नाशिक जिल्ह्यातील लासलगावच्या बाजारपेठेचे नाव समोर येते. परंतु त्याच नाशिक जिल्ह्यातील कांदाही आता सोलापुरात येऊ लागला आहे.

मराठवाडय़ातील उस्मानाबाद, लातूर व बीडबरोबरच औरंगाबाद व जालना येथूनही कांदा सोलापुरात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, नगर आदी भागातील कांद्याची आवक होते. कर्नाटकातील विजापूर, गुलबर्गा, बीदर, बागलकोट येथूनही सोलापुरात कांद्याची आवक होते. सध्या कांद्याची होणारी आवक अनियंत्रित झाली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला महिन्यात अधूनमधून चार दिवस कांद्याचा लिलाव बंद ठेवावा लागला होता.

गेल्या जानेवारीत १२ हजार ३७२ मालमोटारी भरून १२ लाख ३८ हजार २५१ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात पाच दिवस तर ७५ हजार क्विंटलपासून ते एक लाख २६ हजार ७६० क्विंटलपर्यंत कांदा दाखल झाला. प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर १६०० रुपये तर कमाल दर प्रतिक्विंटल ३८०० रूपये मिळाला आहे. स्थानिक व्यापारी, आडत्यांशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संबंध, बाजार समितीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार होणारा आर्थिक व्यवहार यामुळे कांद्याची आवक वाढत चालल्याचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव चंद्रशेखर बिराजदार यांनी सांगितले. याशिवाय रस्ते वाहतुकीचे दूपर्यंत जोडले गेलेले जाळे सोलापूरशी जोडले गेले आहे. हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई, भुवनेश्वर, कोलकाता आदी दूरदूरच्या महानगरांतील व्यापारी कांदा खरेदीसाठी सोलापुरात येतात. दळणवळणाच्या दृष्टीने सोलापूर उत्तम केंद्र मानले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button