breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत छगन भुजबळ यांचं मोठं विधान; म्हणाले..

मुंबई : मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा. त्याऐवजी मला पक्ष संघटनेत हवी ती जबाबदारी द्या, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादीत बदलाचे वारे वाहू लागले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं विधान केलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, राज्यात ओबीसी समाज ५४ टक्के आहे. तो समाज आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणावर जोडला जाऊ शकतो. इतर पक्षांनी त्यासाठीच त्यांचे ओबीसी अध्यक्ष नेमले आहेत. आमच्या पक्षातही ओबीसी नेते खूप आहेत. सुनील तटकरे, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड असे नेते आहेत. मला जबाबदारी मिळील तर मीही काम करेन.

हेही वाचा – पुणे विभागीय अप्पर आयुक्त डॉ. अनिल रामोड अखेर निलंबित

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची आपली अजिबात इच्छा नव्हती पण आमदारांचा आग्रह आणि त्यांनी स्वाक्षऱ्या गोळा केल्याने ते पद स्वीकारले आणि गेले वर्षभर काम केले. पण काही नेत्यांचं म्हणणं आहे की मी कठोर वागत नाही. मग मी सत्ताधारी नेत्यांचं कॉलर पकडायला हवी का? पण आता हे पुरे झाले, मला पक्ष संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या, असं अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button