breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

“कोरोनामुळे भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढणार”-शरद पवार,पहा व्हिडिओ…

कोरोनामुळे राज्यावर अर्थसंकट आहे. कोरोनाचा परिणाम पुढचे दोन वर्ष राहू शकतो. भविष्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढणार आहे. हे संकट मोठं आहे त्यामुळे आतापासून उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आपणही यासाठी तयार झालं पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला…

शरद पवार म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनचे आर्थिक परिणाम दिसून येत आहेत. उत्पादनाची साखळी ठप्प झाली आहेत. उद्योग आणि इतर क्षेत्रातही आर्थिक अडचण आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात याचे वपरित परिणाम जाणवू लागणार आहेत. तसंच, सरकार योग्य नियोजन करत आहे. कोरोनाचा धीराने सामना करा. पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत आपल्याकडे कोरोनाची बाधा कमी असल्याचे त्यांनी सांगितले. 

तसेच सर्व राजकीय पक्षांनाही शरद पवार यांनी आवाहन केले आहे की, राजकारण लोकशाहीत चालते पण ही राजकारणाची वेळ नाही. देशावर संकट आहे. प्रशासनावर ताण आहे. पक्ष विसरुन सरकारला मदत करा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button