breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

अमेरिकेत बायडेन-हॅरिस पर्वास आरंभ; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ घेतली. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचे जगभरातून स्वागत करण्यात आले. विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांचे अभिनंदन केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचे अभिनंदन केले.

मोदी म्हणाले, ‘भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहेत. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे.’ तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचे अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचे यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे’, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी बायडेन यांच्यासह अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणाऱ्या कमला हॅरिस यांचेही अभिनंदन केले. उपराष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतलेल्या कमला हॅरिस यांचे अभिनंदन. हा ऐतिहासिक क्षण आहे. भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आशादायी आहे. भारत-अमेरिका भागीदारी विश्वासाठी फायदेशीर आहे’, असे मोदी यांनी हॅरिस यांचे अभिनंदन करताना म्हटले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button