breaking-newsमनोरंजन

‘झिंगाट’नंतर आता ‘याड लागलं’चं हिंदी व्हर्जन

मराठी सुपरहिट चित्रपट ‘सैराट’चा हिंदी रिमेक ‘धडक’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. मात्र त्यापूर्वी यातील तिसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘पहली बार’ असं या गाण्याचं शीर्षक असून ‘याड लागलं’ या मराठी गाण्याचं हिंदी व्हर्जनच पाहायला मिळत आहे.

इशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांची रोमॅण्टिक केमिस्ट्री गाण्यातून पुन्हा एकदा पाहायला मिळते. मात्र ‘धडक’चं शीर्षकगीत वगळता या दोन्ही गाण्यांमध्ये नाविन्य असं काहीच मिळत नसल्याचं म्हटलं जात आहे. याआधी प्रदर्शित झालेल्या ‘झिंगाट’ गाण्यानेही प्रेक्षकांची निराशा केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button