breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कोरोनामुळे आयपीएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचं निधन

पुणे – कोरोनामुळे समाजातील अनेक प्रतिष्ठीत लोकांचे निधन होत आहे. आता तरुण आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचे कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यांच्यावर त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार घेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

सुधाकर शिंदे हे त्रिपुरा येथील वित्त विभागाचे सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व कोषागार संचालक पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत होते. दोन आठवड्यांपूर्वी शिंदे पत्नी व मुलीसह चौदा दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते. त्रिपुरा केडरच्या २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सुधाकर शिंदे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या उमरा येथील रहिवासी आहेत. आपल्या गावी येण्यासाठी शिंदे यांनी १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२० अशी चौदा दिवसांची रजा घेतली होती. रजा मंजूर झाल्यानंतर ते पत्नी आणि तीन वर्षाच्या मुलीसह गावी आले होते.

दरम्यान, गावातच त्यांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सर्वप्रथम नांदेडच्या गुरूगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारत असताना त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना औरंगाबादहून पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आज उपचारा दरम्यान शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, चार भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

सुधाकर शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण परभणीच्या नवोदय विद्यालयात तर महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले. त्यानंतर पुणे आणि दिल्ली येथे त्यांनी स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करून यश मिळवले. तरुण वयात शिंदे यांचे निधन झाल्याने त्यांच्या सहकारी आणि प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी शोक व्यक्त केला असून, शिंदे यांच्या सारख्या तरुण आयएएस अधिकार्‍यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button