breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोनाच्या संकटातही चीनचे संरक्षण बजेट 6.6 टक्के वाढवले…

बीजिंग | जग कोरोना संकटामुळे आर्थिक मंदीचा सामना करू लागले आहे. त्यामुळे जगभरातील देश संरक्षणावरील खर्चात कपात करू लागले आहेत. असे असूनही चीनने २०२० या वर्षासाठी संरक्षण बजेटमध्ये ६.६ टक्क्यांनी वाढ करत असल्याचे जाहीर करून टाकले. कोरोना संकट पाहता अर्थव्यवस्थाही त्यातून वाटचाल करत आहे. परंतु आताची संरक्षण खर्च गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी असल्याचे चीन सरकारने म्हटले आहे. अमेरिकेनंतर चीन संरक्षणावर सर्वाधिक खर्च करत आहे. कोरोना संकट असूनही चीन यंदा १३.६८ लाख कोटी रुपये संरक्षणावर खर्च करणार आहे.

नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत त्याची घोषणा करण्यात आली आहे. जगातील तिसरी पायदळ सैन्य बाळगणाऱ्या चीनने विमानवाहू जहाज, अणुऊर्जेवरील पाणबुडी व लढाऊ जेटसाठी खजिन्याचे दार उघडले. वार्षिक अधिवेशनात पंतप्रधान ली केचियांग म्हणाले, महामारीमुळे देश अनिश्चिततेच्या परिस्थितीत अडकला आहे आणि अर्थव्यवस्थेला वाईट परिस्थितीशी तोंड द्यावे लागत आहे. आगामी काळात आर्थिक विकासदराची उद्दिष्टे निश्चित न करण्याची चीनची ही पहिलीच वेळ आहे.

चीन तैवानबाबत नरमाईचे धोरण स्वीकारण्यास मुळीच तयार नाही. तैवान स्वत:हून चीनमध्ये सामील न झाल्यास त्याच्यावर लष्करी कारवाई करून ते ताब्यात घेतले जाईल, असा चीनने पवित्रा घेतला आहे. संसदेतील भाषणात चीनचे पंतप्रधान ली केकियांग म्हणाले, आम्ही त्यास विरोध करू. तैवानच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात येणाऱ्या कोणत्याही कारवाईला आमचा कडाडून विरोध असेल. चीनसमोर नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे संकट अर्थव्यवस्था पार कोलडमडल्यासारखी परिस्थिती असूनही चीनने संरक्षण बजेटमधील तरतूद वाढवली आहे. चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था आहे. परंतु सध्या चीनसमोर नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे संकट आहे. अर्थव्यवस्थेवरील संकटानंतरही चीनचे नेते सैन्य बळकटीला जास्त महत्त्व देणे महत्त्वाचे मानतात. वृद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button