breaking-newsआंतरराष्टीय

#CoronaVirus:तालिबानचा दहशतवादी सिराजुद्दीन कोरोना पॉझिटीव्ह, पाकिस्तानच्या रुग्णालयात उपचार

कराची : तालिबानचा उपनेता आणि हक्कानी नेटवर्कचा प्रमुख सिराजुद्दीन हक्कानी कोरोना पॉझिटीव्ह आहे. त्याला रावलपिंडीमध्ये पाकिस्तानच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सिराजुद्दीन हक्कानीने नुकतीच तालिबानी कमांडरशी भेट घेतली होती. त्यामुळे सिराजुद्दीनच्या संपर्कात आलेले नेते संक्रमित झाल्याची शक्यता व्यक्त करण्या येतोय. 

पाकिस्तानमध्ये तालिबानी, हक्कानी नेटवर्क आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या दहशतवाद्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा अहवाल अमेरिकेच्या सुरक्षा विभागाने दिला. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैनिकांना हटवण्यासाठी २९ फेब्रुवारीला अमेरिका आणि तालिबानमध्ये एक करार झाला होता.

पॅंटगॉनने दिलेल्या नव्या अहवालानुसार अफगाणिस्तानच्या भूमीवर दहशतवाद पसरवणाऱ्या हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानतर्फे प्रोत्साहन दिले जात आहे. भारताच्या प्रभावाविरुद्ध नेटवर्क उभे करण्यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button