breaking-newsपिंपरी / चिंचवड

वाल्हेकरवाडीत वाहन अंगावरून गेल्याने एकाचा मृत्यू

पिंपरी (महा ई न्यूज) – मोकळ्या मैदानात झोपलेल्या एका व्यक्तीच्या अंगावरून अज्ञात वाहन गेल्याने त्याचा मृत्यू झाला.  ही घटना चिंचवड येथील वाल्हेकरवाडी, चिंतामणी चौक येथे गुरुवारी (ता. २७) सकाळी उघडकीस आली.
भाऊराव वस्ताद घरबुडे (वय ४० रा. चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. चिंतामणी चौक येथील एका मोकळ्या मैदानात अवजड वाहनांची पार्किंग केली जाते या पार्किंगच्या जागेतच एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षास दिली. घरबुडे हे बाजूलाच असलेल्या चाळीमध्ये राहात असल्याने त्यांची लगेच ओळख पटली. मात्र करमाळा येथून आपले इतर नातेवाईक आल्याशिवाय मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे सकाळी साडेदहा वाजेपर्यंत मृतदेह जागेवरच होता. अपघाताबाबत चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button