breaking-newsक्रिडाताज्या घडामोडीराजकारण

थॅंक्स मोदीजी, आता पुन्हा लोकसभा….; गौतम गंभीरने घेतला मोठा निर्णय

Gautam Gambhir : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजपचा खासदार गौतम गंभीर याने राजकारणातून काढता पाय घेतला आहे. भाजप खासदार गौतम गंभीर यापुढे राजकारण करणार नाहीये. याबाबत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना सोशल मीडिया पोस्टद्वारे विनंती केली आहे. गंभीरला आता फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं असल्याचं त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. २०१९ मध्ये भाजपकडून लोकसभा निवडणूक जिंकून गौतम गंभीर संसदेत पोहोचला.

हेही वाचा – राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार; कुठे कुठे कोसळणार पाऊस?

राजकारणाला रामराम म्हणण्यापूर्वी गौतम गंभीरने  सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे. या पोस्टमध्ये गंभीरने म्हटलंय की, मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button