breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव : जाधववाडीत पुन्हा १५ दिवस लॉकडाउन करा : माजी महापौर राहुल जाधव

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण राज्यामध्ये त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 जाधववाडी परिसर पूर्णपणे परत एकदा 15 दिवसांसाठी लॉकडाऊन करावा, अशी मागणी माजी महापौर राहुल जाधव यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
आयुक्त हर्डिकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये राहुल जाधव यांनी म्हटले आहे की, जाधववाडी परिसरामध्ये आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु, मागील दोन दिवसांमध्ये एकदम तीन रुग्ण आढळून आले आहेत. जाधववाडी आणि परिसरा मध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
तरी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी काल जाधववाडी मधील राष्ट्रभूषन हौसिंग सोसायटी तसेच सिल्वर सिटी, क्रिस्टल सिटी परिसर प्रशासनाच्या वतीने कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे, या वेळी मा.महापौर राहुलदादा जाधव हे आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्या सोबत स्वतः हजर होते. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे करावे, असे आवाहन राहुल जाधव यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button