breaking-newsपुणे

चिनी वस्तूवर बहिष्कार टाकून सैन्याला पाठिंबा द्या : ब्रि. हेमंत महाजन

पुणे : भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताचे 3 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी 130 कोटी भारतीयांना चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलंय

. चीनच्या गोळीबाराला भारतीय सैन्य योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी उत्तर देईन. मात्र 130 कोटी भारतीयांनी चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून भारतीय सैन्याच्या पाठीशी उभं राहावं. भारतीयांना वस्तू विकून मिळालेल्या नफ्यातूनच चीन आक्रमक झाल्याचं मत हेमंत महाजन यांनी व्यक्त केलं.

हेमंत महाजन म्हणाले, “1969 नंतर भारत आणि चीन हद्दीवर कधीही गोळीबार झाला नव्हता. मात्र त्यानंतरची झालेले ही घटना गंभीर आहे. यानंतर आता भारतीय सैन्य कुठं, कधी आणि कशा पद्धतीने प्रतिहल्ला करेल हे एक महत्त्वाचं आहे. हा एक सैनिकी निर्णय असून तो योग्य वेळी योग्य ठिकाणी सैन्य घेईन. यावेळी चीनची आक्रमकता वाढली आहे. लडाखमध्ये त्यांनी भारतीय सैनिकांवर काठीने हल्ला केला आणि आता गोळीबार केल्याने हे गंभीर आहे. त्याला प्रत्युत्तर हे द्यायलाच हवे. यासंदर्भात सर्व भारतीयांनी एक जूट होऊन भारतीय सैन्यासोबत उभा राहिलं पाहिजे. काहीजण चीनला आपला शत्रू मानत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर चिनी वस्तूंवर घातलेला बहिष्कार हा योग्य निर्णय आहे.”

“गेल्या वर्षी चीनने मोठ्या प्रमाणात भारतीयांना वस्तू विकला आणि नफा कमावला. त्याचा उपयोग लष्कराचं बजेट वाढवण्यासाठी केला. त्यामुळे अत्याधुनिक शस्त्रं आले आणि लष्कर आक्रमक झालं. त्यांनी त्यांच्या लष्कराच्या अद्ययावतीकरणासाठी आपला पैसा वापरला. म्हणूनच 130 कोटी भारतीयांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकून सैन्याच्या पाठीशी उभे राहावे. ही दीर्घकालीन लढाई आहे आणि सध्या सर्व भारतीयांनी लष्कराच्या पाठीमागे उभारायला पाहिजे,” असंही हेमंत महाजन म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button