breaking-newsपिंपरी / चिंचवड

अॅटो रिक्षा चालक-मालकांच्या मागण्यांसाठी असंघटीत कामगार कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीत आंदोलन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

अटो रिक्षा चालक-मालक यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटीत कामगार कॉंग्रेस पिंपरी-चिंचवड शहर संघटनेच्या वतीने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी रिक्षाचालक मालकांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.

पिंपरीतील विशाल ई-स्क्वेअर सिनेमा गृहासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सुंदर कांबळे, राष्ट्रीय विद्यार्थी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, महिला अध्यक्षा शीतल कोतवाल, पर्यावरण कॉंग्रेसचे शहराध्यक्ष उमेश बनसोडे, सचिन कोंढरे पाटील, विश्वास गजरमल, निलेश ओव्हाळ, किशोर खंडागळे, बाळासाहेब पाटील, अमर कसबे, सागर देवरे, भरत माकर, जितेंद्र काळे आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

सध्या कोरोनामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाल्याली आहे. अटो रिक्षा चालक-मालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात नवीन रिक्षा घेतलेल्या चालक-मालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत रिक्षा चालक-मालकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी 6 महिन्याची मुदतवाढ द्यावी. साडेसात ते दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान द्यावे. कोरोनाच्या परिस्थितीत व्यवसाय बंद झाल्याने आयुष्याला कंटाळून चार रिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्यात यावी, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button