breaking-newsआंतरराष्टीय
धक्कादायक! 58 जणांचा मृत्यू; अटलांटिक महासागरात स्थलांतरितांची बोट बुडाली
महाईन्यूज | डकार
अटलांटिक महासागरामध्ये शरणार्थ्यांनी भरलेली एक बोट उलटली. यामध्ये 58 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता झाले आहेत. हे शरणार्थी बोटीतून युरोपला जात होते. सर्वजन पश्चिम ऑफ्रिकेतील गाम्बिया देशाचे आहेत. बोटीमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि मुले प्रवास करत होते.
एका वृत्तसंस्थेनी याबाबत वुत्त दिले आहे की, 150 च्या आसपास लोक या बोटीतून प्रवास करत होते. यापैकी 83 जणांनी पोहून जीव वाचविला आहे. घटनेची माहिती मिळताच युएन मायग्रेशन एजन्सीने बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत 58 जणांचे मृतदेह सापडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. अटलांटिक महासागरात पश्चिम ऑफ्रिकेतील मॉरिटानिया या देशाच्या जवळ आल्यावर बोटीतील इंधन संपले होते.