breaking-newsपिंपरी / चिंचवड

कोंढव्यातील दुर्घटनेची राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी केली पाहणी

पिंपरी, (महाईन्यूज) – कोंढवा बुद्रुक येथील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेची राष्ट्रवादी काँग्रेस असंघटीत कामगार विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षा मीना मोहिते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.

  • पुण्यातील कोंढवा बुद्रुक येथे भिंत कोसळून पंधरा निष्पाप लोकांचा बळी गेला. दोनजण जखमी आहेत. शुक्रवारी (दि. 28) मध्यरात्री दुर्घटना घडली. याप्रकरणी बिल्डर अगरवाल याच्यासह आठजणांवर पोलिसांत गुन्हा दाखल आहे. या दुर्घटनेची राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्षा मीना मोहिते यांनी दखल घेतली. त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे असंघटीत कामगार विभागाचे पुणे शहराध्यक्ष राहूल जाधव, उपाध्यक्ष सुरज तुपे, जिल्हा उपाध्यक्षा जयश्री प्रसाद, कृष्णा नेटके, आनंद भवाळ, स्वप्नील गायकवाड, तन्मय भानुसे, गणेश ढोले, राजेंद्र भिलारे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button