breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लोणावळा ते पुणे लोकलच्या वेळेत तात्पुरता बदल

पुणे  – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातंर्गत धावणार्‍या लोणावळा ते पुणे लोकलच्या (गाडी क्र. 99807) वेळेत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात येणार आहे. १ ते २० जुलैदरम्यान हा बदल असणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

लोणावळा येथून ही लोकल आधीच्या वेळापत्रकानुसार सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे. मळवली, कामशेत, कान्हे, वडगाव, तळेगाव, घोरावाडी, बेगडेवाडी स्थानकांवर ही लोकल पूर्वीच्या वेळेतच पोहोचेल. मात्र, देहूरोडपासून पुण्यापर्यंत या गाडीच्या वेळेत किंचित बदल करण्यात आला आहे. देहूरोड येथे सकाळी 9 ऐवजी 8.59, आकुर्डी येथे 9.05 ऐवजी 9.03, चिंचवड येथे 9.09 ऐवजी 9.07, पिंपरी येथे 9.13 ऐवजी 9.11, कासारवाडी येथे 9.17 ऐवजी 9.15, दापोडी येथे 9.21 ऐवजी 9.18, खडकी येथे 9.26 ऐवजी 9.22, शिवाजीनगर येथे 9.32 ऐवजी 9.27 व पुणे स्थानकात सकाळी 9.45 ऐवजी 9.35 वाजता ही लोकल पोहोचेल. प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button