breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचीयाला एनसीबीचे समन्स

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)कडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरू आहे. आता या प्रकरणात एनसीबीने कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा पती अभिनेता हर्ष लिंबाचीया यांना समन्स बजावले आहेत.

मागील २ आठवड्यांपासून एनसीबीने मुंबईतल्या अंधेरी, वर्सोवा, घाटकोपर या भागात धाडसत्र सुरू केले आहे. यात बॉलिवूडशी संबंधित अनेकांची नावे समोर आल्याने त्यांना समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीने हर्ष आणि भारतीच्या घरावरही छापा टाकला. यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत.

दरम्यान, यापूर्वी 9 नोव्हेंबर रोजी एनसीबी पथकाने अर्जुन रामपालच्या घरावर आणि आसपासच्या परिसरावर छापा टाकला होता. या धाडीत अर्जुन रामपालच्या घराची तपासणी करण्यात आली. या दरम्यान त्याच्या घरातून अनेक कागदपत्रे आणि वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावण्यात आले होते. अर्जुनसह त्याची मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रियड्स हीचीदेखील चौकशी करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button