breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उत्सव काळात प्लाॅस्टीक, थर्माकोलचा वापर टाळा – दिलीप गावडे

पिंपरी –  महापालिका आरोग्य विभागाने मागील सहा महिन्यात प्लास्टिक वापरणा-या 141 जणांवर कारवाई करुन  7 लाख 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, एक हजार 879 किलो प्लास्टिक जप्त केले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली. 

पर्यावरणाचा -हास करणा-या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, ग्लास, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, प्लास्टिक व थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घातली आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत संपल्यानंतर महापालिकेने प्लॉस्टिक वापरणा-यांवर धडक कारवाई केली होती. मध्यंतरी ही कारवाई थंड झाली होती.

त्यांनतर पालिकेने पुन्हा धडक कारवाई सुरु केली आहे. गेल्या सहा महिन्यात प्लास्टिक वापरणा-या 141 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून सात लाख पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, एक हजार 879 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयामार्फत प्लास्टिक व थर्माकोल बंदीबाबत जनजागृती करण्यात आलेली असून कारवाईसाठी 32 पथके तयार आहेत. आरोग्य निरीक्षकामांर्फत कारवाई केली जात आहे.

प्लास्टिक व थर्माकोल वापरल्यास पहिल्यांदा आढळल्यास पाच हजार रुपये, दुस-यांदा आढळल्यास दहा हजार आणि तिस-यांदा प्लास्टिक आढळल्यास 25 हजार रुपये व तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्यामुळे नागरिक, व्यावसायिक, उत्पादक, व्यापा-यांनी तसेच उत्सवाच्या काळात सजावटीकरिता प्लास्टिक, थर्माकोलचा वापर करु नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button