breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

#CoronaVirus: तीव्र रुग्णवाढीचा ‘आप’चा दावा

दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ३० हजार झाली असून ३१ जुलैपर्यंत ५.५ लाख करोना रुग्ण असतील, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मंगळवारी केला. करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर सिसोदिया यांनी दिल्लीतील वाढत्या रुग्णांबद्दल चिंता व्यक्त केली.

गेल्या सात दिवसांपासून दिल्लीमध्ये प्रतिदिन १ हजारहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. पुढील १० दिवसांमध्ये ही संख्या ५० हजारांपर्यंत जाईल, असा अंदाज राज्याचे आरोग्य मंत्री सत्येंदर जैन यांनी मंगळवारी व्यक्त केला.

१५ जूनपर्यंत दिल्लीत करोना रुग्णांची संख्या ४४ हजार होऊ शकेल. ३० जूनपर्यंत १ लाख, १५ जुलैपर्यंत २.५ लाख आणि ३१ जुलैपर्यंत ५.५ लाख करोना रुग्ण असतील, असा दावा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. मात्र, हा अंदाज कशाच्या आधारे मांडण्यात आला हे मात्र सिसोदिया यांनी स्पष्ट केले नाही.

दिल्ली प्रशासनाला ३० जूनपर्यंत १५ हजार, १५ जुलैपर्यंत ३३ हजार आणि ३१ जुलैपर्यंत ८० हजार खाटांची व्यवस्था करावी लागेल, असेही सिसोदिया म्हणाले.

दिल्लीमध्ये करोनाचा समूह संसर्ग झालेला नसल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली. मात्र, दिल्लीत करोना रुग्णांपैकी ५० टक्के रुग्णांना कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली याचा स्रोत सापडत नाही. ही स्थिती संसर्ग समूहाची असू शकते. पण, केंद्र सरकारने तसे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही, असे सत्येंदर जैन यांनी पत्रकारांना बैठकीनंतर सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button