breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत ६९२ नवे कोरोना रुग्ण, २५ मृत्यू, संख्या ११ हजार २०० च्या पुढे
मुंबईत ६९२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या ११ हजार २१९ इतकी झाली आहे. आज मुंबईत २५ मृत्यू झाले अशीही माहिती देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. मुंबईत आत्तापर्यंत ४३७ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे.