breaking-news

कुख्यात डॉन संतोष आंबेकरलाही कोरोना संसर्ग

नागपूर : राज्याची उपराजधानी नागपूरभोवती कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. आता नागपूर मध्यवर्ती कारागृहात असलेला कुख्यात डॉन संतोष आंबेकर यालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे . संसर्गानंतर सुरुवातीला काही दिवस त्याच्यावर कारागृहातील रुग्णालयातच उपचार करण्यात आले. सध्या त्याच्यावर मेयोमधील कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मेयो परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नागपूर मध्यवर्ती कारागृहात आतापर्यंत 219 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांचाही समावेश आहे. नागपुरात काल (17 जुलै) एकाच दिवशी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह नागपूर जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 45 वर पोहचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये नागपुरात तब्बल 125 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आता नागपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 2774 वर पोहचली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button