breaking-newsताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांच्या रायगड फार्महाऊसची रेकी करणाऱ्या ३ जणांना अटक

रायगड – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील ‘मातोश्री’ हे निवासस्थान उडवून देण्याची धमकी आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा चांगली अलर्ट झाली. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्महाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. खालापूर तालुक्यातील भिलवले भागात उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे. काल (८ सप्टेंबर) सायंकाळी टुरीस्ट कारने आलेल्या तिघा जणांनी बंगल्याची रेकी केली होती.

फार्महाऊसच्या दिशेने निघालेल्या सुरक्षारक्षकाकडे या तरुणांनी ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली. सुरक्षारक्षकाला संशय आल्याने त्याने आपल्याका माहीत नसल्याचे सांगितले. मात्र ड्युटीवर आलेल्या सुरक्षारक्षकापाठोपाठ हे तरुण तिथे पोहोचले आणि “माहिती असूनही खोटे का सांगितले?” असे विचारत तक्रारदार सुरक्षारक्षकाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली, असा आरोप आहे.

बंगल्याची पाहणी करुन तिघे जण मुंबईकडे निघाले, तेव्हा फार्महाऊसवरील सुरक्षारक्षकांनी गाडीचा नंबर तातडीने मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्र्यांना कळवला. मुंबई एटीएसने तातडीची पावले उचलत कार नवी मुंबई टोल नाक्यावर ताब्यात घेतली. काल रात्रीपासून या तिघा जणांची दहशतवाद विरोधी पथकाकडून कसून चौकशी सुरु आहे.दरम्यान, खालापूर आणि फार्महाऊसवरील पोलिसांची कुमक आणि दंगल नियंत्रण पथकाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक स्वत: खालापूरला एटीएससोबत तपास कार्यात आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘मातोश्री’ निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा फोन ६ सप्टेंबरला आला होता.दुबईहून कुखऱ्यात डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक बोलत असल्याचा दावा करणारा फोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आला होता. त्यामुळे ‘मातोश्री’ निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही परदेशाहून धमकीचा फोन आला होता. आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला होता. हे फोन कोणाकडून आले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button