breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

किवळेत दहा लाखांचा गांजा पोलिसांनी केला जप्त

पिंपरी |महाईन्यूज|

किवळे येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख 65 हजार 175 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, वाकड पोलिसांनीही 50 ग्राम गांजा जप्त केला आहे.

अमोल नारायण आडाल (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली), अल्ताफ पाषा तांबोळी (वय 40, रा. कोंढवा बु. पुणे), नईम रफिक शेख (वय 30, रा. थेरगाव), पुरुषोत्तम लक्ष्मण चौघुले (वय 21, रा. काळेवाडी), सुधीर पांडुरंग देवकाते (वय 24, रा. माहीजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गांजा विक्रीसाठी किवळे येथे किवळे ब्रिजखाली सर्विस रोडवर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावत सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 9 लाख 65 हजार 175 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button