breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रेत’ राहुल गांधींना आदित्य ठाकरेंची साथ

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महारष्ट्रातील नांदेड जिल्हातील देगलूर येथून भारत जोडो यात्रेला आज संध्याकाळपासून सुरूवात होणार आहे.

कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. महारष्ट्रातील नांदेड जिल्हातील देगलूर येथून भारत जोडो यात्रेला आज संध्याकाळपासून सुरूवात होणार आहे. या यात्रेचे काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून स्वागत जाणार असून, रात्री 9 वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार आहेत.

9 नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंसह ठाकरे गटातील काही खासदार आणि आमदार देखील या यात्रेत सहभाग घेणार आहेत. याबाबत महाविकास आघाडीने तयारीही सुरु केली असल्याची माहिती समोर येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button