breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

किल्ले शिवनेरी ते रायगड पालखी सोहळ्याचे दापोडीत आगमन

पिंपरी, (महाईन्यूज) – पैलवान अनिकेत घुले यांच्या वतीने आयोजित श्रीमान छत्रपती शिवाजी महाराज पायी पालखी सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड असा आहे. या सोहळ्याचे आज दापोडी येथे आगमन झाले आहे.

छत्रपतींच्या मूर्तीची शिवभक्तानी शिव आरती केली. यानंतर फुलांनी सजविलेल्या पालखीत छत्रपतीची मूर्ती विराजमान झाली. तेथून ढोल-ताशांच्या गजरात छत्रपतींच्या नामघोषात कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले. शिवभक्तांच्या जयघोषात पालखी पुढे मार्गस्थ झाली. यावेळी पिंपरी विधानसभेच्या युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके यांनी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले.

सर्व शिवभक्तांना न्याहरी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आले. यावेळी नगरसेवक शाम लांडे, कुणाल जणगाडे, अजित बोराडे, मनोज वाखारे, मयूर पुंडे, हेमंत फुगे, सनी कड, ओंकार जगदाळे, रवी नगरकर, नितीन वाघमारे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button