breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

maharashtra budget : अर्थसंकल्पात पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या पदरी निराशा

पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोणत्याही विशेष तरतुदी, प्रकल्प किंवा योजना नाहीत

पुणे : उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोणत्याही विशेष तरतुदी, प्रकल्प किंवा योजना नसल्याने शहरवासीयांच्या पदरी निराशा पडली आहे. शिंदे-फडणवीस सरकारने तोंडाला पाने पुसल्याने शहरवासीयांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे.

शहरात नवीन प्रकल्प येतीस, त्यासाठी विविध तरतुदी केल्या जातील. मेटाकुटीला आलेल्या औद्योगिकनगरीतील उद्योजकांना दिलासा मिळेल अशी शक्यता होती. परंतु शिंदे-फडणवीस सरकाने पिंपरी-चिचंवडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शहरासाठी एकही नवीन प्रकल्प अर्थसंकल्पातून दिला नाही. कोणत्या कामासाठी तरतूद केली नाही. अर्थातच पिंपरी-चिचंवडकरांच्या हाती काहीच पडले नाही. शहरासाठी नवीन प्रकल्प, योजना, तरतुदी आणण्यात भाजपचे तीनही आमदार अपयशी ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पिंपरी-चिचंवडकरांच्या पदरी निराशा निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे. शहरातील उद्योजक, कामगार, गोर-गरिब वर्गासाठी अथवा औद्योगितनगरी म्हणून शहरवासीयांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे निव्वळ घोषणांचा पाऊस पाडणारा आणि सर्वसामान्यांच्या पदरी निराशा निर्माण करणाराच हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button