breaking-newsपिंपरी / चिंचवड

काॅलेज आॅफ फिजिओथेरपी महाविद्यालयात ‘रेडियन्स 2020’ स्पर्धेचे आयोजन

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

निगडी येथील स्वर्गीय फकिरभाई पानसरे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन फिजिओथेरपी ‘रेडियन्स 2020’ स्पर्धेचे आयोजन केले आहे.

स्वर्गीय फकिरभाई पानसरे काॅलेज आॅफ फिजिओथेरपीमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय फिजिओथेरपी स्पर्धा घेण्यात येत आहे. यावर्षी राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन नृत्यकला स्पर्धा, फिजिओथेरपी इनोव्हेशन आणि महाविद्यालयीन क्रिडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत शैक्षणेत्तर स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणासह क्रिडा काैशल्य दर्शवण्याची संधी उपलब्ध होत आहे. या विद्यार्थ्यांच्या परिपुर्ण सहभागामुळे रेडियन्स 2020 आयोजित कार्यक्रमात पुर्णत्वास येईल. या स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवावे, असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button