breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

रोहित शर्माला मुंबई-पुणे महामार्गावर अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल दंड

पुणे : रोहित शर्माने भरधाव वेगात कार चालवून नियमबाह्य वर्तन केलं आहे. यामुळे त्याच्याविरोधात तीन चलन तयार झाले असून त्याचा दंड त्याला भरावा लागणार आहे. आज होणाऱ्या सामन्यासाठी पुण्यामध्ये असून त्याने मुंबईहून पुणे प्रवासादरम्यान त्याच्या लॅम्बोर्गिनी ने प्रवास करत असताना २०० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवल्याबद्दल ३ चलन ठोठावण्यात आली आहेत.

अहमदाबादेतील भारत पाकिस्तान सामना संपल्यानंतर तो हेलिकॉप्टरने मुंबईला गेला होता. त्याने तिथे दोन दिवस आपल्या कुटुंबीयांसह वेळ घालवला. यानंतर तो पुण्याला जाण्यासाठी संघाच्या बस व्यतिरिक्त दुसरा मार्ग निवडला. रोहित त्याच्या लॅम्बोर्गिनी कारने पुण्यात पोहोचला.

हेही वाचा – केंद्रप्रमुखपदी पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसारच!

रोहितने पुण्याच्या दिशेने वेगात गाडी चालवल्याबद्दल पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ताशी २०० किमी/प्रतितास वेगाने कार चालवली. त्यातल्या एकदा तर त्याच्या कारने ताशी २१५ किमी इतका प्रचंड वेग घेतला होता. नियम मोडून कार चालवल्याने पुणे वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंड म्हणून तीन चलन आकारले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button