breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नागरिकांची फसवणूक करणा-या बांधकाम व्यावसायिकास अटक करा

टेल्को कपूर हाैसींग सोसायटीसह अन्य सोसायटींच्या नागरिकांची मागणी

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

निगडी प्राधिकरणातील टेल्को कपूर हाैसींग सोसायटीसह परिसरातील अन्य गृहरचना व औद्योगिक सोसायट्यांची खोटी कागदपत्रे तयार करुन सुमारे 200 कुटूंबाची फसवणूक करणा-या बांधकाम व्यावसायिकाला अटक करा, तसेच बांधकाम व्यावसायिक बी.के.जैन यांच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात भा.दं.वि. संहिता कलम 406,420,467,468, 506 नूसार गुन्हा दाखल आहे. तसेच कोर्टाने देखील जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पोलिसांनी संबंधिताला तत्काळ अटक करुन चाैकशी करावी,अशी मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीने केली आहे.

त्या समितीने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निगडी परिसरातील टेल्को कपूर हाैसींग सोसायटी, होरायझाॅन हाैसींग सोसायटी, सोनिया हाैसींग सोसायटी या सर्व सोसायटींचा मालक असल्याचे भासवून एकच प्लाॅट चार जणांना विकला गेला आहे. सर्व सोसायटीचे ओरीजनल कागदपत्रे स्वताःकडे ठेवून सदरील बांधकाम व्यावसायिकाने शेकडो कुटूंबाची आर्थिक फसवणूक केलेली आहे. सभासदांच्या समंतीशिवाय परस्पर त्याचे प्लाॅट गहाण ठेवून कर्ज काढले गेले आहे.

सदरील सोसायटीच्या सभासदांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात, सहकार विभाग, नवनगर प्राधिकरण यांचेकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तरीही संबंधितावर कोणतीही कारवाई होत नाही.

दरम्यान, संबंधित बांधकाम व्यावसायिकांचा अटक पुर्व जामिन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. तयार केलेली सर्व बोगस कागदपत्रे, ओरीजनल कागदपत्रे हजर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे व्यावसायिकासह इतर साथीदारांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी प्रकाश बिजलानी, महेश बिजलानी, भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे तात्यासाहेब उदुगडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button