breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

काश्मीर मधील कलम 370 हटविण्याला विरोध करणाऱ्या IAS अधिकाऱ्याने राजकारणाला ठोकला रामराम

श्रीनगर: IAS ची नोकरी सोडून राजकीय नेता झालेले शाह फैजल यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. शाह फैजल हे प्रशासकीय सेवेत पुन्हा रुजू होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, आयएएस होऊन मी राष्ट्राच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरलेलो आहे. काहीजण मला देशविरोधी म्हणत असल्याने शाह फैजल दु:खी झालेले आहेत. पुढे ते म्हणाले, मला कोणीही देशद्रोही म्हणू शकत नाहीय.

मला येथून पुढे जायचे आहे आणि पुन्हा सर्व नव्याने सुरू करण्याची इच्छा आहे. भविष्यात जी काही परिस्थितीत असली तरी जीवन थांबू शकत नाहीय. आपल्या समोर गरीबी, अशिक्षिकता, असमानता आणि बेरोजगारीच्या मोठ्या समस्या आहेत. पुढल्या वेळेस कुठे जाईन हे वेळच सांगू शकेल. गेल्या वर्षी  5 ऑगस्ट रोजी जेव्हा जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा निर्णय घेतला तेव्हा, इतर नेत्यांप्रमाणे शाह फैजल यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना सोडण्यात आलं आहे. त्यानंतर शाह फैजल यांनी पार्टी सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button