breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

धक्कादायक! व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित

वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भात एका मोठी बातमी आहे. ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊसबाहेर गोळीळीबार झालेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे. सध्या स्थिती नियंत्रणात असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.

‘व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार झालेला आहे. मात्र स्थितीवर तातडीनं नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे. यासाठी मी गुप्तहेराचे आभार मानतो,’ असंही डोनाल्ड ट्रम्प म्हणालेले आहेत. सध्या ते सुरक्षित असल्याची मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारादरम्यान तिथल्या सुरक्षा यंत्रणेनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. यावेळी आरोपीला गोळी लागली असून तो सध्या जखमी आहे. आरोपीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. या गोळीबारात एक अधिकारीही सहभागी असल्याची माहिती मिळालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button