breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Good News: पिंपरी-चिंचवडमध्ये जून महिन्यात ६०३ ‘कोरोनामुक्त’; आजपर्यंत शहरातील ८६५ रूग्ण झाले पूर्णपणे बरे!

पिंपरी |महाईन्यूज | प्रतिनिधी

कोरोनाच्या या महासंकटाचा फटका संपूर्ण देशाला बसला आहे. राज्यात सर्वांधिक रूग्णांची नोंद आत्तापर्यंत झाली आहे. मुंबई, पुण्यापाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून ‘कोरोनामुक्त’ होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असून जून महिन्यात तब्बल ६०३ रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झालेत. तर आज (दि.१८) सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील ८६५ रूग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना विविध रूग्णालयातून ‘डिस्चार्ज’ देण्यात आला आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता. ११ मार्चला पहिला बाधित रूग्ण आढळून आला होता. सुरूवातीला कमी असलेल्या या आजाराने कालांतराने शहराला घट्ट विळखा घालण्यास सुरूवात केली आहे. आज शहरातील सर्वच भागात कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ आढळले असून बाधित रूग्णांची संख्या तब्बल १४५३ वर पोहचली आहे. तर आजपर्यंत शहरातील २४ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या संकटात आता दिलासादायक बाब समोर आली आहे. ‘कोरोनामुक्त’ होणाऱ्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. आजपर्यंत शहरातील ८६५ रूग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. ३१ मे अखेर २६२ रुग्ण शहरात ‘कोरोनामुक्त’ झाले होते. आता केवळ १८ दिवसांत शहरातील तब्बल ६०३ रूग्ण बरे झाले आहेत. गेल्या आठवड्यापासून प्रत्येक दिवशी ‘कोरोनामुक्त’ झाल्याने ‘डिस्चार्च’ होत असलेल्या रूग्णांची संख्या देखील वाढत आहे. 

जून महिन्यात ‘कोरोनामुक्त’ झालेल्यांची संख्या

दिनांक – डिस्चार्ज रूग्ण संख्या (एकूण ‘कोरोनामुक्त’)

०१ जून – १४ (२७६)

०२ जून – ०७ (२८३)

०३ जून – २६ (३१९)
०४ जून – ४७ (३६६)
०५ जून – ३५ (४०१)
०६ जून – ३६ (४३७)
०७ जून – ०१ (४३८)
०८ जून – ३४ (४७२)
०९ जून – ०९ (४८१)
१० जून – २५ (५०६)
११ जून – १० (५१६)
१२ जून – २८ (५४४)
१३ जून – ७३ (६१७)
१४ जून – ५६ (६७३)
१५ जून – ६१ (७३४)
१६ जून – ५७ (७९१)
१७ जून – ३८ (८२९)
१८ जून –  ३६ (८६५) (सकाळी ११ वाजेपर्यंत)

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button