breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus: धक्कादायक! कोव्हिड सेंटरमध्ये जागाच नसल्याने 72 वर्षीय आजोबा मोजत आहेत अखेरचे क्षण

सातारा: महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आणखी गडद होत असतानाच साताऱ्यातून एक संतापजनक माहिती समोर आलेली आहे. कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेण्यासाठी जागाच नसल्याने 72 वर्षीय आजोबा आपल्या आयुष्याच्या अखेरच्या घटका मोजत असल्याचा प्रकार उघड झालेला आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर काल एक महत्वाची बैठक कराड येथे पार पडलेली आहे. यावेळी सातारा जिल्ह्यातील कोव्हीड सेंटरच्या दुरावस्थेबद्दल अनेकांनी चिंता व्यक्त केलेली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्वरित अशा संदर्भात कारवाईचे आदेश दिलेले आहेत. तसेच कराडमधील कोव्हिड सेंटरमध्ये तात्काळ उपाचार उपलब्ध होत असल्याचे सांगितलेले आहे.

आरोग्यमंत्र्यांच्या या सूचनेला 24 तासही झाले नसताना कराडमधील या कोव्हिड सेंटरमध्ये एका 72 वर्षीय कोव्हिडबाधित पुरुषाला दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यांना आता व्हेंटिलेटरवर ठेवण्याची तातडीची गरज असताना त्यांचे नातेवाईक या आजोबांना घेऊन सरकारी रुग्णलयातही गेले होते. तेथेही तीच परिस्थिती आहे. त्यांना कराडच्या एरंम हॉस्पिटलमध्ये देखील दाखल करून घेतले जात नाहीय. याविषयी त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र अद्यापही ते या 72 वर्षीय वृद्धाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचंच चित्र आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button