breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी चिंचवडकराचे चोवीस तास पाण्याचे स्वप्न अधुरेच ; काम रखडल्याने ठेकेदाराला पावणे दोन कोटीचा दंड

प्रतिदिन दंडात्मक कारवाईच सुरुच, त्याच ठेकेदाराकडून कामे पुर्ण करणार 

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवडकरांना चोवीस तास पाण्याचे स्वप्न तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काॅंग्रेस दाखविले होते. त्यानूसार केंदाच्या जेएनएनयुआरएम योजनेंर्गत शहरात पहिल्या टप्प्यात 40 टक्के भागात पाणी पुरवठा कामास प्रारंभ झाला. परंतू, संबंधित ठेकेदाराने विहित मुदतीत कामे पुर्ण करता आली नाहीत. सध्यस्थितीत पाणी पुरवठ्याची सुमारे 29 टक्के काम पुर्ण झाली असून उर्वरीतही सर्वच कामे संबंधिताकडून करण्यात येणार आहे. परंतू, सदरील कामास विलंब लावल्यामुळे 1 कोटी 78 लाख रुपये दंडात्मक कारवाई पाणी पुरवठा विभागाकडे करण्यात आलीय, तसेच त्या ठेकेदारावर प्रतिदिनी दंडात्मक कारवाई अद्याप सुरुच असल्याचे सहशहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले. 

पिंपरी चिंचवड शहरात 2४ चोवीस तास पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यात दिघी, भोसरी, मोशी, जय गणेश साम्राज्य, स्पाईन रोड, संभाजीनगर, शाहूनगर, निगडी, यमुनानगर, प्राधिकरण, चिंचवडमधील केशवनगर, प्रेमलोक पार्क, थेरगाव, दत्तनगर, सांगवीच्या काही भागात राबविण्यात येत आहे. त्या भागात 24 तास पाणीपुरवठा योजनेचे कामे अर्धवट स्थितीत आहेत. या कामाची निविदा 217 कोटी रुपयांची होती. परंतु, ठेकेदाराला 207 कोटी रुपयांमध्ये हे काम देण्यात आले होते. कामाची मुदत अठरा महिन्याची होती. कामाला सुरुवात 19 जून 2016 मध्ये झाली होती. त्या कामावर सुमारे चाळीस कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार काम 18 जून 2018 ला काम पुर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, निर्धारित मुदतीत ठेकेदाराकडून काम पुर्ण झाले नाही. दोन वर्षात केवळ 29 टक्के काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे या ठेकेदाराला महापालिकेने प्रतिदिन दंड आकारणी सुरु केली आहे.  त्यानुसार आजपर्यत तब्बल 1 कोटी 78 लाख रुपयांचा दंड ठेकेदाराकडून वसूल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button