breaking-newsराष्ट्रिय

प्राप्तिकर विभागाचे खबरे बना आणि करोडपती व्हा!

नवी दिल्ली – प्राप्तिकर विभागाचे खबरे बना आणि करोडपती व्हा! ही घोषणा म्हणजे गंमत नसून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) काळा पैसा आणि बेनामी व्यवहारांना आळा घालण्यासाठी खरोखरीच महत्वाची बक्षीस योजना जाहीर केली आहे.

या योजनेनुसार बेनामी व्यवहार किंवा मालमत्तेबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला देणाऱ्यास 1 कोटी रूपये बक्षीसापोटी मिळणार आहेत. परदेशात काळा पैसा जमवल्याची माहिती उघड करणाऱ्यास तब्बल 5 कोटी रूपयांचे इनाम दिले जाणार आहे. देशांतर्गत उत्पन्न किंवा मालमत्तेशी संबंधित करचुकवेगिरीची माहिती दिल्यास 50 लाख रूपयांपर्यंत बक्षीस मिळणार आहे. अशाप्रकारची माहिती देणाऱ्याबाबत पूर्ण गुप्तता बाळगली जाईल. माहिती देणाऱ्याची ओळख उघड केली जाणार नाही, अशी ग्वाही कर विभागाकडून देण्यात आली आहे.

बेनामी व्यवहारांना आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने याआधीच संबंधित कायदे आणखी मजबूूत आणि कठोर केले आहेत. आता काळा पैसा उघड करण्याच्या आणि करचुकवेगिरीला आळा घालण्याच्या प्रयत्नांमध्ये जनतेला सामावून घेण्याच्या उद्देशातून बक्षीस योजना जाहीर करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button