breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कोरोना नियंत्रणासाठी दिल्लीला सर्वतोपरी मदत करणार, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

चंदीगढ – राजधानी दिल्लीत प्रदुषण वाढल्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे दिल्ली पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. अशा परिस्थितीत दिल्ली प्रशासन आणि नागरिकांना लागेल ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिग यांनी दिलं आहे. तसेच, पंजाबमध्ये कोरोना योद्ध्ये ज्या प्रकारे कोरोनाशी दोन हात करत आहेत, त्यांच्या या कामाचीही त्यांनी प्रशंसा केली आहे.

“देशाची राजधानी दिल्ली सध्या कठीण काळातून जात आहे. दिल्लीची लढाई सुरुच आहे. अशा कठीण काळात आम्ही दिल्लीला जमेल तशी मदत करण्यास तयार आहोत. आम्ही दिल्लीकरांच्या मदतीसाठी नेहमीच उपलब्ध राहू.” असं पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले. तसेच, कोरोची दुसरी लाट कधी येईल हे कुणीही सांगू शकत नाही. राजधानी क्षेत्र आणि इतर राज्यांचे अनुभव पाहून देशात कोरोनाची दुसरी लाट निश्चितपणे येणार असं वाटत आहे , अशी शक्यताही सिंग यांनी व्यक्त केली.

दिल्लीत शनिवारी कोरोनाचे 5879 नवे रुग्ण

दिल्लीत कोरनाग्रस्तांच्या आकड्यांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिल्लीत शनिवारी तब्बल 5879 नवे कोरोनाबाधित आढळले. तसेच, शनिवारी एकूण 111 बाधितांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये शनिवारी 6963 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 23 हजार 117 वर गेला आहे. तर आतापर्यंत एकूण 8270 जणांचा कोनोमुळे मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीमध्ये 39741 सक्रिय रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button