breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कामगार दिनी कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांसाठी – एक उपवास कृतज्ञतेचा, सहवेदनेचा

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यातील मजुर, बांधकाम कामगार,फेरीवाल्यांच्या, हमालांच्या, शेतमजूरांच्या, सफाई कर्मचा-यांच्या, मोलकरणींच्या, धाब्यावर, खानावळीत काम करणारांच्या, मच्छिमारांच्या, भटक्या विमुक्तांच्या, आदिवासी दलितांच्या, बेघरांच्या. लाॅकडाऊन जगण्याचेच. या लाॅकची चावी म्हणजे श्रम करण्याची, रोजगारांची संधी. आपण सर्व एका अभूतपूर्व अशा करोना नामक आपत्तीला सामोरे जात आहोत. या आपत्तीचा सर्वात जास्त फटका या अशा हातावर पोट असणा-या ,  कष्ट करून कुटुंब पोसणा-या मजूरांना व स्थलांतरित मजूरांना बसला आहे.  त्यांचे विविध मागण्या साठी आज आगळा  वेगळा  उपवास हा राज्यव्यापी करण्यात आला कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष गणेश राठोड ,राजेश माने, इरफान चौधरी ,अनील बारवकर ,माधुरीजलमूलवार , वंदना थोरात , अर्चना कांबळे,  सुनिता वाठोरे, नाना कसबे, उमेश डोरले आदीनी विविध ठिकाणी सहभाग नोंदवत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.राज्यात सर्व जिल्ह्यात उपवास करण्यात आले यात जेष्ट नेते उल्का महाजन , चंदन कुमार, नितिन पवार,  मेकँजी दाबरे, सुभाष लोमटे , हिरामण पगार यांचा सहभाग होता.

ताळेबंदीत हाताला काम नाही. मजूरी नाही. या सर्वांच्या श्रमावर हा देश उभा आहे. पण रस्त्यावर उतरून गावाकडे चालत निघेपर्यंत ते आहेत, याचं भानच नाही या समाजाला, देशाला, सरकारला. हे थोडेथोडके नाहीत देशाच्या लोकसंख्येपैकी ४०% आहेत. सकल राष्ट्रीय उत्पन्नात त्यांच्या श्रमात महत्वाचा  वाटा असणारे  यांतील लाखो कुटुंबांकडे रेशनकार्ड देखील नाही. सरकार काही पावले उचलत आहे. कार्डधारकांना कमी दरात व काहींना मोफत धान्य दिले जात आहे. पण रेशनकार्ड नसलेल्या कुटुंबांची अवस्था भीषण आहे. एनजीओनी व कंपन्यांनी त्यांना मदत केली आहे पण ती पुरेशी नाही.आताच्या घडीला केवळ दयाभावनेतून केलेली तात्पुरती मदत पुरेशी नाही तर  गरज असलेल्या सर्वांना पुढील दोन महिने मोफत रेशनची व्यवस्था करणे आवश्यक आहे. अन्यथा करोनापेक्षा भयंकर परिस्थिती होईल. १मे रोजी जो आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे, आणि महाराष्ट्र दिन निमीत्त  भूमिका समाजासमोर व सरकारसमोर लावून धरण्यासाठी , श्रमिकांच्या आत्मसन्मानासाठी  आपापल्या जागी पुढील मागण्यासाठी  सुर्योदय ते सुर्यास्त या काळात उपवास करण्यात आला.

१) असंघटीत कामगाराना आर्थिक सहाय्य देण्यात यावे व उपासमारीवर मात करण्यासाठी गरज असलेल्या सर्वांना कार्ड नसले तरी मोफत धान्य मिळाले पाहिजे.

२) राज्यांतर्गत स्थलांतरित मजूरांना त्यांच्या गावी परत नेण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावी.

३) लाॅकडाऊन मधे ज्या मजूरांना त्यांचे थकीत वेतन व देय वेतन मिळण्यासाटी तालुका व जिल्हा स्तरावर यंत्रणा कार्यरत करण्यात यावी. अत्यावश्यक सेवा बजावणा-या सर्व कर्मचा-यांना दुप्पट पगार द्यावे व पन्नास लाखांच्या विम्याचे संरक्षण देण्यात यावे.

४) या काळात घसरलेल्या आर्थिक वाढीच्या दराचा बोजा कामगार वर्गाच्या माथी मारून कामगार विरोधी धोरणे व कायदे करण्यात येऊ नयेत.

५) लाॅकडाऊन संपवण्याची रणनीती विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींसोबत चर्चा करून ठरवण्यात यावी. ही कृती सरकार विरोधी नाही, सरकारला त्यांच्या संविधानिक जबाबदारीचे भान करून देण्यासाठी जागृत नागरिकांनी उचललेले सजग पाऊल आहे.तसेच संपूर्ण देश व देशातील संपन्नता ज्यांच्या अमूल्य योगदानावर व श्रमावर उभी असते त्या कामगार वर्गाप्रति आपले उत्तरदायित्व व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे. वरील मागण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी सहभाग नोंदवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button