breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘मोफत तिकीट दिलं नाही, नाटक कसं होतं बघतो’; अमोल कोल्हेंचा पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी मोफत तिकीट दिलं नाही म्हणून नाटक कसं होतं बघतो अशी धमकी दिल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी स्वत: प्रेक्षकांसमोर येत ही घटना सांगितली आहे.

अमोल कोल्हे म्हणाले की, प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी पोलीस बांधवांनी प्रचंड सहकार्य केलं. नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी तर २ हजार ५०० पोलीस बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या महानाटकाचं तिकीट काढून दाखवलं. मात्र, आज मी खेदाची बाब शेअर करण्यासाठी आलो आहे.

हेही वाचा – ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

आज पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत खेदजनक अनुभव आला आहे. ती त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. ही प्रवृत्ती नाटकाचे मोफत तिकीट मागण्याची आहे. अगदी शेवटी ३०० रूपयांचं तिकीट काढून आपल्या लेकरांना संभाजीमहाराजांचा इतिहास दाखवायला आलेल्या प्रत्येक पालकाचे मी आभार मानतो, असं अमोल कोल्हे म्हणाले.

मोफत तिकीट मागणाऱ्या प्रवृत्तीला मी एवढंच सांगतो की, इथं बसलेले सर्वजण कराचे पैसे देतात आणि त्या करातून पोलिसांना महिन्याचा पगार मिळतो. असं असूनही छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी हे मोफत तिकीट मागतात. तसेच मोफत तिकीट दिलं नाही, तर नाटक कसं होतं ते बघतो असं म्हणतात. माझी हात जोडून विनंती आहे की, पोलीस दलाला उज्वाला परंपरा आहे. २६/११ च्यावेळी ज्यांनी जीवाचं बलिदान दिलं. कोविड काळात ज्यांनी प्राणांची पर्वा न करता रस्त्यावर होते. त्यामुळे इथं बसलेल्या त्या पोलीस बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की अशा पोलीस दलाच्या उज्वल परंपरेला शुल्लक कारणासाठी गालबोट लावू नको. मी जाणीवपूर्वक तुमचं नाव घेत नाहीये, असंही अमोल कोल्हे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button