breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दुर्घटना टळली…संचेती चौकातील भुर्यारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडली

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

मुसळधार पावसामुळे शुक्रवारी पुण्यातील संचेती चौकातील भुर्यारी मार्गावरील  दिशादर्शक लोखंडी कमान पडली. शिवाजीनगरला जाणारे रस्ते बंद झाले आहेत. दरम्यान, लॉकडाउन असल्यामुळे मंगळवार पेठेसारखी मोठी दुर्घटना टळली आहे.

तसेच, शनिवार वाड्याजवळील एक झाड उन्मळून पडले आहे.

कारागृहातील अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार असलेला वृक्ष उन्मळून पडला

येरवडा कारागृहातील अनेक कैद्यांचा साक्षी असणारा प्रवेशद्वारा समोरील १०० वर्षा पूर्वीचा वट वृक्ष जोरदार वादळी पावसामुळे उन्मळून पडला. या वटवृक्षाच्या सावली खाली कैद्यांचे नातेवाईक वाट पहात थांबलेले नेहमी दिसत असत. कारागृहात आणि कारागृहा बाहेर घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्ष ठरलेला हा वटवृक्ष आज उन्मळून पडला. लॉकडाऊन मध्ये रस्त्यावर गर्दी नसल्याने, तसेच येरवडा कारागृह संपूर्ण लॉक डाऊन असल्याने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button