breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

…तर मोहन भागवतांनाही दहशतवादी म्हणतील; राहुल गांधींची टीका

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याबाबत काँग्रेस राहुल गांधी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. हा कायदा रद्द व्हावा यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केले.

यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना नवे कृषी कायदे शेतकरीविरोधी असल्याचं सांगितलं. “करोनामुळे नुकसान होणार सांगितलं होतं पण कोणी ऐकलं नाही. आज मी पुन्हा सांगतोय की शेतकरी, मजुरासमोर कोणतीही शक्ती उभी राहू शकत नाही. जर पंतप्रधांनी कायदा कायदा मागे घेतला नाही तर फक्त भाजपा, आरएसएस नाही तर देशाचं नुकसान होणार आहे,” असा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला.

वाचाः खुला प्रवर्ग हा ‘कोटा’ नाही, खुला प्रवर्ग सर्वांसाठीच; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

पुढे ते म्हणाले की, “भाजपा आणि नरेंद्र मोदींचं एकच ध्येय असून ते शेतकरी आणि मजुरांना कळलं आहे. आपल्या आसपास जे दोन चार मोठे उद्योगपती आहेत त्यांच्यासाठी पैसे उभं करण्याचं काम नरेंद्र मोदी करतात. त्यांच्याकडे संपूर्ण भारत सोपवला आहे”.

“जो विरोधात उभं राहतो त्याच्याविरोधात मोदी काही ना काहीतरी चुकीचं बोलत असतात. शेतकरी उभे राहिले तर शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतील. मजूर उभे राहिले तर त्यांना दहशतवादी म्हणतील. एखाद्या दिवशी मोहन भागवत उभे राहिले तर त्यांनाही दहशतवादी म्हणतील. थोडक्यात जो कोणी मोदींकडून सत्ता घेण्याचा प्रयत्न करणार त्याला दहशतवादी ठरवलं जाणार,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button