breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव

पुणे |महाईन्यूज|

मुंबईतल्या सिल्व्हर ओकनंतर काटेवाडीतल्या गोविंदबागेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी मुंबई येथील पवारांचे निवास्थान सिल्व्हर ओकवर बारा जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय आज ही संख्या 473 झाली असून 500च्या जवळपास पोहोचली आहे. पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. गोविंद बागेतील जवळपास 50 कर्मचाऱ्यांचे दोन टप्प्यात स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी आज 4 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button