breaking-newsआंतरराष्टीय

युट्युबच्या प्रिमीयम सेवांसाठी आता युजर्सला मोजावे लागणार पैसे

वॉशिंग्टन : युट्युबने आता आपल्या ग्राहकांसाठी प्रिमीयम सेवा लाँच केल्या असून यात युजर्ससाठी दोन स्वतंत्र प्लॅन सादर करण्यात आले आहेत. खरे तर, युट्युबवर ऑक्टोबर २०१५ पासूनच युट्युब रेड या नावाने प्रिमीयम सेवा सुरू आहे. तथापि, याशिवाय युट्युबअजून एक नवीन सेवा सुरू करणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून युट्युबने एका ब्लॉग-पोस्टच्या माध्यमातून यावर शिक्कामोर्तब केले आहे.

यात युट्युब प्रिमीयम या नावाने नवीन पेड सेवा सुरू करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी ग्राहकाला दरमहा ११.९९ डॉलर्स मोजावे लागणार आहेत. यामुळे आता युट्युब रेड ही सेवा समाप्त होणार असून याचेच रूपांतर युट्युब प्रिमीयममध्ये करण्यात आले आहे. अर्थात यात काही नवीन फिचर्सची जोड देण्यात आली आहे. याच्या अंतर्गत आता ग्राहकाला युट्युब ओरिजनल्स पाहता येणार आहे. यात दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, डॉक्युमेंटरीज आदींचा समावेश असेल.

दरम्यान, यासोबत युट्युब म्युझिक ही नवीन सेवादेखील सुरू करण्यात आली आहे. नावातच नमूद असल्यानुसार ही म्युझिक स्ट्रीमिंग सेवा होय. याच्या अंतर्गत ग्राहकाला जाहिराती नसलेल्या संगीताचा आनंद घेता येणार आहे. युट्युबवर असणार्‍या लक्षावधी गाण्यांच्या खजिन्यातून ग्राहकाला हवे ते ऐकता येणार आहे. यासाठी स्वतंत्र अ‍ॅप आणि डेस्कटॉपसाठी प्लेअर लाँच करण्यात येणार आहे. यामध्ये ग्राहकाला ऑफलाईन असतांनाही संगीत ऐकण्याची सुविधा दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button