breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय
कांद्याच्या किंमतीवरून ट्विंकल खन्नाचा अर्थमंत्र्यांना टोला
अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती ट्विंकल खन्ना ही आपली मते बेधडकपणे मांडण्यासाठी लोकप्रिय आहे. ब्लॉग, ट्विटरच्या माध्यमातून उपरोधिकपणे सद्यस्थितीवर आपली मतं मांडण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. ट्विंकलने तिच्यात शैलीत पुन्हा एकदा कांद्याच्या किंमतीवरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना जोरदार टोला लगावला आहे. तिने सोशल मीडियावर कांदा या विषयावर ब्लॉग लिहिलेला आहे.
या ब्लॉगमध्ये तिने कांद्याची तुलना अॅव्होकाडो या फळाशी केली आहे. अॅव्होकाडो हे अत्यंत महागडे फळ आहे. या लेखात तिने निर्मला सीतारामन यांनी संसदेत कांद्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा उपरोधिक समाचार घेतला आहे. “तरी बरं, निर्मला सीतारामन यांनी कांद्याच्या किंमतीवर बोलताना फ्रान्सची क्वीन मेरी अँटॉइनसारखं ‘कांदा नाही तर कांदाभजी खा’ असं काही म्हणाल्या नाहीत”, अशी जबरदस्त टीका तिने केली.