breaking-newsमनोरंजन

बॉलिवूड नव्हे तर ‘हा’ दाक्षिणात्य अभिनेता आलियाला वाटतो स्टायलिश

आपल्या दमदार अभिनयासोबतच अनोख्या फॅशन सेन्समुळे तरुण अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच चर्चेत असते. मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका पुरस्कार सोहळ्याला आलियाने हजेरी लावली होती. यावेळी दिलेल्या मुलाखतीत तिला सर्वांत स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेता कोण वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिच्या तोंडून निघालेल्या अभिनेत्याचं नाव ऐकताच उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

आलिया म्हणाली, “अमिताभ बच्चन हे मला नेहमीच स्टायलिश वाटतात आणि मला विजय देवरकोंडाचा स्टाइल सेन्स आवडतो, तो खूप मस्त आहे.” आलिया बॉलिवूडमधल्या एखाद्या अभिनेत्याचं नाव घेईल असं अनेकांना अपेक्षित होतं. पण आलियाने दाक्षिणात्य कलाकार विजय देवरकोंडाचं नाव घेतल्याने सर्वच जण थक्क झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button